Description
परदेशी चित्रपट, साहित्य व निसर्ग याची भुरळ पडली नाही असे कोणी वाचक नसावे. मी सुध्दा त्यातीलच एक प्रत्यक्ष त्या जीवनाचा भाग होण्याची संधी मिळाली. तेंव्हा मात्र आलेले अनुभव काही वेगळेच होते. अर्थात ज्याच्या त्याच्या अनुभव संपादनक्षमता व संवेदना वेगळया असु शकतात. निसर्गदत्त सौदर्याची उधळण असलेल्या संपन्न व वैभवशाली देशात मला पर्यटन करता करता सुखी आयुष्याला दुरावलेले जीवनमुल्ये ढासळल्यामुळे भरकटलेले, मैत्र शोधणारे केविलवाणे, जखमी जीवन भेटले. असुरक्षित कुटुंब व्यवस्था,बेजबाबदार पालक, एकटेपणा, त्यामुळे लागलेली व्यसने, योग्य मार्गदर्शन व आधाराशिवाय नव्या पिढीचे हतबल भविष्य, सर्व सुखसोयी व पोषक राजकिय वातावरण असुनही बेधुंद तरुणाई पाहुन आवश्यक झाले.
About The Author
शिक्षण क्षेत्रातील अनेक वर्षांच्या अनुभवानंतर, राहुन गेलेला छंद जोपासण्यासाठी लेखनाची सुरवात केली. सुक्ष्म निरीक्षण व समोरच्या व्यक्तीचे मन वाचण्याचा नाद आता स्वतःला लेखिका म्हणुन घडवण्यासाठी उपयुक्त होत आहे. ‘अल्बम’ हा कथासंग्रह प्रसिद्ध झाला.कथा,ललित,शैक्षणिक तसेच सामाजिक विषयांवर लेखन प्रसिद्ध झाले. बदलत्या काळाची चाहुल ओळखत आता ई बुक क्षेत्रात प्रवेश करत आहे.आपले विचार जास्तीत जास्त वाचकांना अनुभवता यावे या उद्देशाने लिहिलेले हे ई बुक वाचकांना आवडेल असा विश्वास आहे.
Reviews
There are no reviews yet.