Description
भेटण्यास येतात कविता मला, माहीत नाही कुठल्या जन्माची ही पुण्याई, मग उधळण होते भावनांची आणि नकळत उमटू लागते मनावर विचारांची शाई । दिसता खरे रूप शब्दांचे, थिजून जातो भगवंताचे विराट रूप पाहिलेल्या अर्जुनापरी व्यक्त होण येत असूनही निशब्द होऊन जातो बोलता न येणाऱ्या बालकापरी । शब्द आणि भावना यांच्या मिलनाने उजळून निघतो मनाचा गाभारा, मग अशी कविता जन्म घेते, जसा अनपेक्षित जन्म घ्यावा काळोखात तेजस्वी तारा। असूनही वेळ, काळ, परिस्थितीच भान पण तरीही बेभान, असते एक वेगळीच दशा, मनातला आपल्याच विश्वात हरवून गेलेला फकीर जागा होतो, जो शोधत असतो आपलीच दिशा। मग भूत, वर्तमान, भविष्य वाटू लागतात एकसारखे, निरर्थक वाटू लागतात धावणारे वेळेचे काटे, कविता म्हणजे क्षितिज, स्वप्न आणि सत्य एकत्र भेटण्यास मला येतात ज्या वाटे।
Reviews
There are no reviews yet.