Description
विठ्ठलाच्या नामस्मरणाने जसा सर्व परिसर रम्यमान होतो, तसाच आज आपला देश हा तरुणाई या एका शब्दात एकवटत आहे. प्रत्येक ठिकाणी बोललं जातं की भारत हा तरुणांचा देश आहे. आज 60 टक्के लोकसंख्या हि तरुण आहे. मग तरुणाईत ऊर्जा भरभरून असते, हे आम्ही स्वामी विवेकानंद त्यांच्याकडून शिकलो. ही ऊर्जा कशी वापरायची हा खरा प्रश्न आहे. प्रत्येक क्षेत्रात आज भारताला महत्त्व आहे. हा भारत पुढील दहा वर्षात एक महासत्ता पण होऊ शकतो. औद्योगिक क्रांती आधी युरोपात झाली, नंतर अमेरिकेत आणि आता ती संधी भारताला मिळणार आहे, असे वाटत आहे. या संधीचं सोनं कसं करायचं हे फक्त आपले तरुण ठरवू शकतात. मी ह्या माझ्या पुस्तकात आजच्या तरुणांची मनाची स्थिती ते आचरण या स्थितीचा माझा मतप्रवाह मांडणार आहे. सोबतच कोणत्याही प्रामाणिक प्रश्नाला उत्तर हे मी माझ्या परीने देण्याचा प्रयत्न करणार आहे. एक सक्षम भारत निर्मितीसाठी तरुणाईला कोणत्या दिशेने घेऊन जाता येईल, हे पण आपण बघणार आहोत. हे माझे तिसरे पुस्तक आहे, पहिल्या माझ्या दोन्ही पुस्तकात सुद्धा मी युवा वर्गाचा जास्त विचार केला आहे. तरुणांची मौज मस्ती करू नये या मताचा मी नक्कीच नाही, त्यामुळे तरुणांनी हे पुस्तक वा चण्याआधी माझ्याबद्दल काही गैरसमज असतील, तर ते दूर करावे. चला तर मग करू आपण आपल्या आयुष्याच एक विश्लेषण !!!
About the Author
“लेखक एक व्यावसायिक, सामाजिक कार्यकर्ता, प्रेरणादायी वक्ते, व्यवसाय आणि व्यवस्थापन मार्गदर्शक, उद्योजक आहेत. हे समाजामध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी कार्य करतात. यांनी २००१ मध्ये आपले अभियांत्रिकी शिक्षण पुर्णा करून, मास्टर ऑफ बिजनेस अॅडमिनिसट्रेशन केले. आपले शिक्षण पुढे सुरू ठेवून त्यांनी बॅचलार ऑफ लॉं, डिंप्लोमा इन पर्सोनल मॅनेजमेंट अँड इंडस्ट्रियल रेलेशनशिप, पोस्ट ग्रॅजुएट डिंप्लोमा इन कस्टमर रेलेशनशिप मॅनेजमेंट हे पूर्णा केले. मागील वर्षी त्यांनी कॉर्पोरेट सोशल रिस्पोन्सिबिलिटी या विषयावर आपली पीएचडी मिळवली आहे. यांचे रिसर्च पेपर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रकाशित झाले आहेत.
आपल्या नोकरीच्या काळात यांनी एक मार्केटिंग एक्झिक्युटिव पासून सुरवात करून जनरल मॅनेजर पर्यन्तचा प्रवास १० वर्षात केला. त्यानंतर २०१४ पासून ते आपला व्यवसाय करीत आहेत. त्यांना त्यांच्या पीएसके एजुकेशन आणि ट्रेनिंग या कंपनीसाठी २०१६ मध्ये लीडर अवॉर्ड ने सन्मानित करण्यात आले. त्यांना आपल्या सामाजिक कार्यासाठी खूप ठिकाणी सन्मानित करण्यात आले आहे. यंग अचिवर अवॉर्ड, विवेकानंद युवारत्न, २०१५ लीडर अवॉर्ड, नेलडा सन्मान, हे त्यातील काही उल्लेखनीय पुरस्कार आहेत. ते अखिल रयत सेवक क्रांतिकारी संघ, रयत एज्युकेशन अँड मल्टीपर्पाज सोसायटी या दोन्ही सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आहेत. तसेच स्पार्टबन सोशल वर्कर ऑफ इंडिया या संस्थेचे चेअरमन आणि ऑल इंडिया पेरेंट्स असोसिएशन चे महाराष्ट्र राज्य-उपाध्यक्ष म्हणुन काम करतात.
लेखक एक असे व्यक्ति आहेत जे देश,विदेश फिरले आहेत आणि आपल सामाजिक दायित्व खूप चांगल्या प्रकारे जपतात. हे शिक्षणाचा प्रचार, युवकांचा विकास, देशाच्या माहिलांच सशक्तीकरण आणि येणार्या पिढीचा कौशल्यविकास याला प्राथमिकता देतात.”
Reviews
There are no reviews yet.