Description
ABOUT THE BOOK
स्त्रीत्वापासून स्त्रियांना मातृत्व लाभते. त्याच मातृत्वामुळे या जगाचा डोलारा चालत आहे. स्त्री ही एक आई, एक सहचारिणी, एक बहिण, एक मैत्रीण , एक प्रियेसी आणि अशा कितीतरी नात्यांची ती जन्मदात्री आहे. तिच्या मुळेच मानवजात टिकून आहे. तिच्यामुळे घराला घरपण येतं. असे असतानाही तिला अनेक यातनांना , संघर्षाला सामोरे जावं लागतं. कधी स्वतःच्या घरातून विरोधाला सामोरे जावे लागते तर कधी जुनाट, वाईट परंपराना बळी जावं लागतं. स्त्री ही जेवढी सोशिक तेवढीच कणखरही असल्याचे दिसून येईल.
बऱ्याच वेळा स्त्रियांना स्वतःला स्वतः चे सामर्थ्य कळत नाही. उलट स्त्रि ही दुसऱ्या स्त्रिच्या वाटेत काटे पेरते.तिचा दुस्वास करते. स्त्रियांच्या आयुष्यात आई होण्याला अनन्यसाधारण महत्व आहे. पण एखाद्या बाईस बाळ होत नसेल तर तिला वांझ
म्हणून हिणवण्यात स्त्री च पुढे असते. स्त्रियांची कुचंबणा, त्यांच्या वेदना, व्यथा त्यांच्या कुटूंबियाची व्यथा मांडण्याचा आणि त्यांच्या दुखाला आवाज देण्याचा केलेला प्रयत्न.
Reviews
There are no reviews yet.